Ad will apear here
Next
रिपब्लिकन पक्षाच्या महापालिकेतील कार्यालयाचे उद्घाटन

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) पुणे महानगरपालिकेतील पक्ष कार्यालयाचे रविवारी, २३ जून रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

महापालिकेच्या नवीन इमारतीमध्ये सर्व पक्षांना आणि पदाधिकाऱ्यांना भव्य कार्यालये देण्यात आली आहेत. त्यात पहिल्या मजल्यावरील रिपब्लिकन पक्षाचे सुसज्ज असे कार्यालय उभारले आहे. पक्ष कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर भारतीय संविधानाची उद्देशिका लावण्यात आली असून, कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संसद भवन यांचे एकत्रित चित्र बसविण्यात आले आहे. आतमध्ये असलेल्या अँटी चेम्बरमध्ये पंढरीच्या वारीचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे. 

रामदास आठवले यांनी पक्ष कार्यालयाच्या या सुसज्जतेबद्दल गटनेत्या सुनीता वाडेकर आणि परशुराम वाडेकर यांचे कौतुक केले. या वेळी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना आठवले यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी  उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, अल्पसंख्याक आघाडीचे अयुब शेख,  शहराध्यक्ष अशोक कांबळे, राष्ट्रीय निमंत्रक अॅड. मंदार जोशी,  सरचिटणीस महिपाल वाघमारे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे,  नगरसेविका सुनीता वाडेकर, हिमाली कांबळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZJUCB
Similar Posts
खासदार गिरीश बापट यांचा रिपब्लिकन पक्षातर्फे सत्कार पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे शाखे तर्फे महायुतीचे पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून गिरीश बापट यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी
‘झुलवा’कार उत्तम तुपेंना मिळाले नवीन घर पुणे : ‘लेखक-साहित्यिक चळवळी बळकट करण्यासाठी आपले आयुष्य लावतात; मात्र अनेक साहित्यिकांना वृद्धापकाळात हलाखीचे जीवन जगावे लागते. काही दिवसांपूर्वी ‘झुलवा’कार ज्येष्ठ लेखक उत्तम बंडू तुपे यांच्या हलाखीच्या जगण्याची वस्तुस्थिती माध्यमांनी समोर आणली होती. यापुढे दलित साहित्यिकांची उपेक्षा होऊ देणार नाही,’
‘आरपीआय’चा ६१वा वर्धापनदिन सोहळा तीन ऑक्टोबरला मुंबई : ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (आरपीआय) ६१वा वर्धापनदिन तीन ऑक्टोबरला ठाण्यातील ढोकाळी येथील हायलँड मैदानात आयोजित करण्यात आला असून, या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. या वेळी ‘आरपीआय’च्या कार्यकर्त्यांनी
‘बाबासाहेबांचे विचार देशाच्या प्रगतीला पूरक’ पुणे : ‘डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी देशाच्या विकासाला दिशा दिली. सर्व समाजाला एकसंध ठेवत समतेची वागणूक देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आजच्या घडीलाही बाबासाहेबांचे विचार देशाच्या प्रगतीला पूरक आहेत’, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी व्यक्त केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language